Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रतीक्षा संपली; पोलिसांसाठी आता ई आवास योजनेअंतर्गत घरे

प्रतीक्षा संपली; पोलिसांसाठी आता ई आवास योजनेअंतर्गत घरे
, शुक्रवार, 5 मार्च 2021 (07:57 IST)
वर्षानुवर्षे पोलीस वसाहतीतील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता तातडीने ‘ई-आवास योजने’अंतर्गत प्राधान्याने चांगली घरे देण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेतला आहे. त्यामुळे शेकडो पोलिसांची गेल्या अनेक वर्षांची घरांची प्रतीक्षा संपणार आहेच मात्र त्यांच्या डोक्यावरील धोक्याची तलवारही यामुळे बाजूला होणार आहे.
 
मुंबई पोलीस दलाच्या अखत्यारीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शहरात दादर, मरोळ, शिवडी, जोगेश्वरी, घाटकोपर, वरळी आदी जवळपास ६५ ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. त्यातील अनेक इमारतींची डागडुजी वेळेत होत नसल्याने गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणच्यामोडकळीस आलेल्या इमारतीत अपघात होऊन जिवीत आणि वित्त हानी होण्याचे प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. आता पोलीस खात्याच्या या नव्या निर्णयाने जुन्या धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीतून पोलिसांना हलवून चांगल्या इमारतीत घरे देण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेतला आहे. यामुळे इतर पोलिसांना पोलीस वसाहतीतील नवीन घरे देण्यास काही काळ स्थगिती देण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांच्या (मुख्यालय-२ ) कार्यालयातून एका नोटिशीद्वारे ही बाब पोलिसांसाठी सूचित करण्यात आली आहे.
 
दरम्यान, पोलीस दलाच्या या निर्णयाचे पोलिसांनी स्वागत केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या या नोटिशीत धोकादायक इमारतीत राहणाऱ्या पोलिसांना ई आवास प्रणालीत पर्याप्त संख्येत घरांचे वाटप होत नाही. त्यामुळे पोलीस धोकादायक इमारतीत राहत आहेत. ही बाब गंभीर असून, भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडून जीवितहानी होवू शकते, त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या पोलिसांना प्राधान्याने याच महिन्यात ‘ई आवास प्रणाली’च्या घरे देणे आवश्यक आहे असे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीस यांच्याबाबत बदनामीकारक व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल