Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्राइम ब्रँच अधिकारी बनून चोरट्यांनी वकिलाला लुटले, पोलिसांनी ओपींना ठोकल्या बेड्या

arrest
, शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (10:42 IST)
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, महाराष्ट्र पोलिसांनी बनावट पोलीस असल्याचे दाखवून लोकांना लुटणाऱ्या टोळीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी 5 आरोपींनी मिळून एका वकिलाला लुटले होते. आम्ही गुन्हा शाखेचे अधिकारी असून तुम्हाला ताब्यात घेण्यात येत असल्याचे त्यांनी वकिलाला सांगितले. पहिले वकिलाने त्यांना विरोध केला, पण या चोरटयांनी दबाव टाकल्याने नंतर वकील त्यांच्या त्यांच्यासोबत गेले.
 
आरोपींनी मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवून वकिलाचे त्याच्याच कारमधून अपहरण केले, त्यानंतर वाटेतच आरोपींनी वकिलाला खाली पाडले आणि पैसे व गाडी घेऊन पळून गेले. यानंतर वकिलाने पोलिसात तक्रार केली, व हे प्रकरण उघडकीस आले.
 
पोलिसांनी सांगितले की, 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता एक वकील खार पश्चिम येथील कॅश डिपॉझिट मशिनमध्ये (CDM) पैसे जमा करण्यासाठी गेले होते, तेव्हा पाच आरोपींनी, स्वत:ला गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणवून घेत, त्याला ताब्यात घेतले जात असल्याचे सांगितले. तसेच वकिलाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची धमकी देऊन त्यांना गाडीत बसवून घेऊन गेले. त्यानंतर काही वेळ गाडी चालवल्यानंतर त्यांना रस्त्याच्या मधोमध सोडून 5 लाख रुपये घेऊन पळून गेले. तर या प्रकरणी खार पोलिसांनी गुरुवारी पाच जणांना अटक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी कारवाई करत मुंबई पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. संदेश मालाडकर, प्रफुल्ल मोरे, विकास सुर्वे, चेतन गौडा, दर्शन याज्ञिक अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पोलिसांनी पुढे सांगितले की, मुख्य आरोपी संदेश मालाडकर याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल असून प्रफुल्ल मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींना 18 सप्टेंबरपर्यंत मुंबई पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'आनंदाचा शिधा' घोटाळा प्रकरण : हिंमत असेल तर चौकशी करा-काँग्रेसचे आव्हान