राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी तिसरं समन्स प्राप्त झालं असून आज मुंबईत सुनावणी होणार आहे. त्यासाठी पवार आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असल्याचं सांगितले जात आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात देखील पवारांना समन्स बजावण्यात आले होते. त्याआधी देखील एक समन्स बजावण्यात आले. पण पवार वैयक्तिक कारणांमुळे साक्ष नोंदविण्यासाठी जे. एन. पटेल यांच्या आयोगासमोर हजर राहू शकले नाही. आता त्यांना तिसरं समन्य बजावण्यात आलं असून त्यानुसार आज पवार आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती मिळतेय.