Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? : शेलार

हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? : शेलार
, सोमवार, 19 जुलै 2021 (15:23 IST)
भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले.समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला.ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही.गेली २५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या २५ वर्षात असं कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे," अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली.आमदार अँड आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर सविस्तर भाष्य केले. 
 
मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते.समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडुपरच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरले. २६ जुलैच्या पावसातही भांडुप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते.त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे,असेही अॅड शेलार म्हणाले.
 
"मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली २५ वर्षे काम करत आहे.माझ्या कार्यकाळात असं कधी पाहिले नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत.या घटना म्हणजे मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?,अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक,आमदार,खासदार,पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही," असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, असंही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय खेळाडूंचा पहिला संघ टोकियो पोहोचला