Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत लहान मुलांचे असे होणार लसीकरण

मुंबईत लहान मुलांचे असे होणार लसीकरण
, शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (09:31 IST)
लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लान तयार केला आहे. केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सुचना येताच येताच २-३ दिवसांत लहान मुलांचे लसिकरण सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईत ३० लाख लहान मुलांचं लसिकरण करण्याचे ध्येय आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.  प्रसुतीगृह आणि लहान मुलांची रुग्णालये, महापालिकेची ३५० लसिकरण केंद्रे याठिकाणी लहान मुलांचे लसिकरण होईल. लस देण्यासाठीची सिरींज, निडल कदाचित वेगळी असेल, निडलची साईज काय असेल याबाबत स्पष्टता नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं गरजेचं असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले आहे. 
सुरेश काकाणी म्हणाले, “पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेत. मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतही गाईडलाईन नंतर स्पष्टता येईल. १५०० व्यक्तींच्या स्टाफला लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रेनींग देण्यात येईल. खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनींग देणार. लहान मुलांच्या लसिकरणानंतर काही रिअ‍ॅक्शन्स आल्या तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करता येईल. तसेच लहान मुलांच्या लसिकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल”
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी