Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशी आहे नवरात्रोत्सवासाठी नियमावली

अशी आहे नवरात्रोत्सवासाठी नियमावली
, गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (22:34 IST)
मुंबईत अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मुंबई महापालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव होण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणेच यंदाच्या नवरात्रोत्सवावरही काही निर्बंध घातले आहेत. यासंदर्भातील जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. गर्दी करू नये. सार्वजनिक देवीची मूर्ती ४ फूट तर घरगुती मूर्ती २ फुटांची असावी. गरबा खेळण्यास आणि देवीची आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
 
या जाचक नियमांमुळे तरुण-तरुणी, महिला वर्ग आणि बच्चे कंपनीही काहीशी नाराज होणार आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना आवश्यक माहितीची पूर्तता करू न उत्सव साजरा करण्यासाठी आणि मंडपासाठी ‘ऑनलाईन’आणि विना शुल्क परवानगी मिळणार आहे.
 
पालिकेची नवरात्रोत्सवासाठी नियमावली 
 
- पालिका आयुक्तांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्याबाबत जारी परिपत्रकाची माहिती व्हाट्सॲप, ट्विटर याद्वारे कळविण्यात येणार आहे. पालिका यंत्रणेने २३ सप्टेंबरपासून ऑनलाईन परवानगी देण्यास सुरू केली.
 
- शक्यतो पारंपरिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातूची मूर्ती/ संगमरवर मूर्तीची पूजा करावी. शाडू मातीची मूर्ती वापरल्यास घरीच विसर्जन करणे. 
 
-कोरोना नियमांचे पालन करणे.
 
-देवीची आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढू नये.
 
-विसर्जनासाठी आणि आरतीसाठी १० पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करू नये.त्याचप्रमाणे, घरगुती आणि सार्वजनिक नवरात्रौत्सवात भपकेबाज सजावट असू नये.
 
- गरब्याचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
- भजन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
 
- देवीच्या मंडपात सॅनिटायझर फवारणी करून तेथील जागा दिवसातून तीन वेळा निर्जंतुक करणे. थर्मल स्क्रिनिंग करणे. 
 
-कोरोना नियमाचे पालन करून साथरोग, इतर रोगांबाबत आणि रक्तदान शिबिरांबाबत आयोजन करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
 
- सार्वजनिक देवीच्या मूर्तींचे दर्शन हे ऑनलाईन, केबल यांच्या मार्फत करण्यात यावे.
 
- रस्त्यावर हारफुले यांची दुकाने थाटण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
- प्रसाद वाटप, विद्युत रोषणाई करणे टाळावे.
 
-नवरात्रौत्सवात शेवटच्या दिवशी देवीच्या मूर्तीचे थेट विसर्जन स्थळी विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली असून भक्तांनी देवीची मूर्ती ही पालिका कर्मचारी यांच्याकडे विसर्जनासाठी द्यावी.
 
-जर मंडप कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यास देवीच्या मूर्तींचे विसर्जन हे मंडपातच पाण्याच्या टाकीत करावे.त्याचप्रमाणें, जर विसर्जनाच्या दिवशी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून इमारत सील करण्यात आली असेल तर देवी मूर्तींचे विसर्जन हे पाण्याने भरलेल्या बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, कॉलेज, महाविद्यालये कधी उघडणार