Publish Date: Sun, 07 Jul 2024 (15:05 IST)
Updated Date: Sun, 07 Jul 2024 (15:08 IST)
महाराष्ट्रातील ठाण्यात पोलिसांनी अमली पदार्थासह दोघांना अटक केली असून त्यांच्या कडून 8.6 लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमली विरोधी पथकाने डायघर परिसरातील एका हॉटेल समोर सापळा रचून दोघांना पकडले. शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलर कि अमली विरोधी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कडून 86 ग्राम मेफेड्रोन पावडर जप्त केले आहे.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपींची हे अमली पदार्थ कुठून आणले आणि ते कुठे विकायचे होते याचा तपास पोलीस करत आहे.
या पूर्वी देखील मार्चच्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 3.25 कोटी रुपयांची अंदाजे किंमत असलेले 16 किलो ड्रग्ज जप्त केले होते आणि 12 तस्करांना अटक केली होती.
webdunia
Publish Date: Sun, 07 Jul 2024 (15:05 IST)
Updated Date: Sun, 07 Jul 2024 (15:08 IST)