Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाणे स्टेशनवर दोन नवे पादचारी पूल सुरू

local train
, शनिवार, 2 मार्च 2024 (07:58 IST)
ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सात ते आठ लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करीत असताना ठाणे पूर्व व पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वेकडून 28 मे 2019 रोजी तोडण्यात आला होता.
 
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना १३ नोव्हेंबर 2019 रोजी या दोन पुलाची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली होती. त्यानंतर महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण व मुंबई दिशेस नवीन पादचारी पूल व मुंब्रा येथील पादचारी पूल अशा एकूण तीन पुलासाठी महापालिकेने 24 कोटी निधी रेल्वेला देण्याचे मंजूर केले. त्यातील पहिल्या टप्प्यात 8 कोटी दुसर्‍या टप्प्यात 4 कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्द केला होता. मात्र त्यानंतरही पुरेशा निधी अभावी या दोन्ही पुलांचे काम थांबले. खासदार राजन विचारे यांनी आवश्यक ५ कोटींचा निधी रेल्वेकडे वर्ग करावा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली. अखेर आयुक्त अभिजीत बांगर यांनी याची दखल घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलासाठी 5 कोटीचा निधी 8 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेकडे सुपूर्द केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांच्याशी चर्चा करून 2 ते 3 वेळा मेगाब्लॉक घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पुलाचे गर्डर रात्री स्वतः उपस्थित राहून टाकून घेतल्या त्यानंतर पुलाचे काम जलद गतीने मार्गी लावून पूल तयार झाला.
 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईच्या पाणीपुरठ्यातील 1 मार्चपासून लागू होणारी 10 टक्के कपात आता रद्द