मुंबईतील मिठीनदीत दोन जण बुडाले आहेत. या दोन जणांमधील एकाचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध सुरू आहे. हे दोघ जण कुर्ल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील दोघे जण गुरूवारी रात्री लघुशंकेसाठी माहीमच्या खाडीवर उभे होते. त्यावेळी एकाचा पाय सरकला आणि तो थेट नदीत पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने नदीत उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांनी बचाव कार्याला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी त्यानंतर एकाचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला आहे. परंतु, दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबई बुडालेल्या तरुणांचा शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोध घेतला जात आहे. कारण मुंबईत पाऊस असल्याने शोध कार्यात अनेक अडचणी येत आहेत. एका तरुणाचा मृतदेह पाण्यासोबत किनाऱ्यावर आला आहे.