Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईच्या पावसात मरण्याची भीती, भिंत कोसळल्याने करंट लागून मरण्याच्या भीतीने 2 महिला शिडीवर दोन तास उभ्या राहिल्या

मुंबईच्या पावसात मरण्याची भीती, भिंत कोसळल्याने करंट लागून मरण्याच्या भीतीने 2 महिला शिडीवर दोन तास उभ्या राहिल्या
, रविवार, 18 जुलै 2021 (17:57 IST)
रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर भिंत कोसळल्याने करंट लागण्याच्या भीतीने दोन महिला मुंबईच्या माहुल भागातील झोपडीत एका लाकडी शिडीवर दोन तास उभ्या राहिल्या.माहुलच्या भरतनगर भागात पहाटे 1 च्या सुमारास डोंगरावर वसलेल्या काही घरांमध्ये कंपाऊंडची भिंत कोसळून 15 जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
 
या भागात भिंत कोसळल्यामुळे बाहेरच्या लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तेव्हा 40 वर्षीय लक्ष्मी जोंगकर त्यांच्या झोपडीत होत्या. त्यांनी घराची खिडकी उघडली तेव्हा बघितले की बर्‍याच झोपडपट्ट्यांचा नाश झाला होता.पण, त्यांच्या हे लक्षात आले नाही की ढासळणारी माती त्याच्या घरात देखील शिरली आहे आणि त्यांच्या झोपडीचे देखील नुकसान झाले आहे.
 
लक्ष्मीने सांगितले की "लोक घाबरले आणि ओरडू लागले की परिसरात विद्युतप्रवाह पसरला आहे, हे ऐकून मी माझ्या झोपडीत एका अन्य महिला नातेवाईकासह एका लाकडी शिडीवर उभे राहिले आणि दोन तासांनंतर, एक माणूस आमच्याकडे चौकशी करायला आला आणि आम्हाला बाहेर येण्याचे म्हटले " एका महिलेने काठीच्या सहाय्याने दार उघडले आणि घराबाहेर पडण्यास सांगितले.
 
विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शनिवारी रात्री पासून मुंबईत मुसळधार पाऊस रविवारी सकाळी देखील सुरूच आहे,त्यामुळे विनाश होण्याचे दृश्य दिसत आहे. येथे, भिंत कोसळण्याशी संबंधित दोन स्वतंत्र झालेल्या अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टोकियो ऑलिम्पिक : युगांडा,दक्षिण आफ्रिकेच्या संघामधील काहींना कोरोनाची लागण