Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 2 March 2025
webdunia

ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर विजेचा धक्का लागून दोन कामगार भाजले

current shock
, शुक्रवार, 31 जानेवारी 2025 (18:38 IST)
Thane News:ठाणे जिल्ह्यातील दिवा रेलवे स्थानकावर केबल बसवताना विजेचा धक्का लागून दोन कामगार गंभीर रित्या भाजले. ही घटना 28 जानेवारी रोजी घडल्याची माहिती सरकारी रेलवे पोलिसांनी शुक्रवारी दिली. 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा मानकांचे पालन न केल्याने निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे. 
या अपघातात तंत्रज्ञ आणि मदतनीस दोघे गंभीर भाजले आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
हे दोघे कामगार योग्य देखरेखी शिवाय विद्युत् केबल  हाताळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटना घडली त्यावेळी एकही जबाबदार अधिकारी तेथे उपस्थित नव्हते.
केबल चुकून वरुन जाणाऱ्या हाय टेंशन वायरच्या संपर्कात आली आणि दोघांना विजेचा धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
रेलवे पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 125 अणि कलम 289 अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. या कामाला जबाबदार असलेले जखमी कामगार, त्यांचे पर्यवेक्षक,सम्बंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत मध्य हवेत विमान अपघातात 67 ठार