Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन वर्षाचा चिमुकला गाडी खाली आला पण ..

Two year old Chimukala's car came down but .. दोन वर्षाचा चिमुकला गाडी खाली आला पण .. Marathi Mumbai News in  Webdunia Marathi
, सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (10:17 IST)
विरार पश्चिम मध्ये ग्लोबलसिटीच्या एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात धक्कादायक व्हिडीओ कैद केला गेला. हा व्हिडीओ अंगाला थरकाप आणणारा आहे. या व्हिडीओ मध्ये 2 वर्षाचा चिमुकला गाडीखाली आल्याची धक्कादायक घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओ मध्ये एका 2 वर्षाच्या चिमुकल्यावरून गाडी गेली. पण असं म्हणतात की दैव तारी त्याला कोण मारी. असेच काही या चिमुकल्या सोबत झाले. या मुलाच्या अंगावरून कार गेली, मात्र सुदैवाने त्याला कुठलीही दुखापत झाली नाही.तो कार खालून सुखरूप बाहेर पडला. तस्मय बर्डे असे या चिमुकल्याचे नाव आहे. कार चालक मनोज यादव आणि नैना सावंत यांच्या विरोधात बेजबाबदारपणे कार चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
विरार पश्चिमच्या ग्लोबल सिटीच्या गार्डनर एव्हेन्यू मध्ये बर्डे कुटुंब वास्तव्यास आहे. 23 फेब्रुवारी रोजी तस्मय ला त्याची आजी सोसायटीच्या आवारात खेळण्यासाठी घेऊन आली असता बेजबाबदार कार चालक मनोज यादव याने हॉर्न न देता अर्टिगा कार ने तस्मय ला जोरदार धडक दिली. या मध्ये तो कारच्या खाली आला मात्र तो कारच्या मधोमध असल्याने त्यालाजास्त दुखापत झाली नाही. किरकोळ जखमा आल्या. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

बर्डे कुटुंबीयांनी कार चालक मनोज यादवच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सांगलीत शेतकरी आंदोलनाचा भडका ,एमएसईबी सब स्टेशन पेटवले