मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.
तसेच युतीची औपचारिक घोषणा उद्या 24 डिसेंबर 2025 सकाळी 12 वाजता होण्याची शक्यता आहे. शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी X वर एक जुना फोटो पोस्ट करून "उद्या 12 वाजता" असा संकेत दिला आहे. युतीचा "मनोमिलन" झाला असून, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार BMC च्या 227 जागांपैकी शिवसेना (UBT) ला 150+ जागा आणि मनसेला 60-70 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबईबरोबरच ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली इत्यादी ठिकाणीही युती होण्याची शक्यता आहे. तसेच हे ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे, कारण 2017 नंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे आणि शिंदे गट-भाजपाच्या महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे
तसेच निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल लागतील. अर्ज भरण्याची प्रक्रिया आज 23 डिसेंबर सुरू झाली आहे.
Edited By- Dhanashri Naik