Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॉलमधील लसीकरण फक्त दुपारनंतर सुरू राहील. तर डीमार्टमध्ये आता लसीकरण होणार नाही

vaccine
, बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (09:41 IST)
नवी मुंबई महापालिकेने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत वर्धक मात्रा देण्यासाठी नवी मुंबईत दोन मॉल व सात डीमार्टमध्ये लसीकरणासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. आता डीमार्टमधील लसीकरण बंद करण्यात आले असून मॉलमध्ये फक्त शनिवारी व रविवारी लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेची वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर, तुर्भे येथील रुग्णालये, कामगार विमा रुग्णालय तसेच २३ नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरणाची ही जनअभियान योजना राबवण्यात आली. यात एकूण २१ हजारांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. नवी मुंबईत १८ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे दोन्ही लसमात्रांचे राज्यात सर्वात प्रथम १०० टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरण मोहीम देशात सुरू झाल्यानंतर बहुतांश नागरिकांनी पहिली व दुसरी लसमात्रा घेतली आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहरातील दोन मॉल व ७ डी मार्ट येथे २३ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत विशेष लसीकरण मोहीम राबवली. त्यात २१ हजारांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. मॉलमधील लसीकरण फक्त दुपारनंतर सुरू राहील. तर डीमार्टमध्ये आता लसीकरण होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार- मोहित कंबोज