Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थप्पड लागताच व्यक्ती रुळावर पडली तेवढ्यात ट्रेन आली आणि सर्व संपलं, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

थप्पड लागताच व्यक्ती रुळावर पडली तेवढ्यात ट्रेन आली आणि सर्व संपलं, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ
, शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (13:35 IST)
मुंबईतील सायनमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सायन रेल्वे स्थानकावर क्षणभराच्या रागामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली एक व्यक्ती थप्पड लागल्याने रुळावर पडली आणि तेवढ्यात लोकल ट्रेन आली. अपघाताचा व्हिडिओ अत्यंत भीषण आहे. ही हृदयद्रावक घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निदेश राठोड या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
 
किरकोळ वादात जीव गमावला
व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की किरकोळ वादानंतर एक व्यक्ती दिनेशला थप्पड मारतो आणि तो प्लॅटफॉर्मवरून खाली रुळावर पडतो. तो उठण्याचा प्रयत्न करत असतानाच एक ट्रेन येते आणि चटकन त्याचा मृत्यू होतो. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातलेला दिनेश प्लॅटफॉर्मवर असलेल्या शीतल माने या महिलेशी वाद घालत असल्याचे दिसून येते. यानंतर संतापलेली महिला दिनेशला वारंवार छत्रीने मारताना दिसत आहे. तेवढ्यात महिलेचा पती अविनाश मानेही तेथे पोहोचतो आणि दिनेशला चापट लावतो त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो रुळावर पडतो.
 
थप्पड लागताच दिनेश रुळावर पडला
थप्पड लागताच दिनेशचा तोल जातो आणि तो रुळावर पडताना दिसत आहे. ट्रेन जवळ येताच आजूबाजूला प्रवासी दिनेशला वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या काठाकडे धावतात तर काही लोक ट्रेन थांबवण्यासाठी हातही हलवतान दिसत आहेत, मात्र दिनेशला प्लॅटफॉर्मवर चढता आले नाही आणि ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला होता. दिनेश राठौर बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) मध्ये काम करत होतो अशी माहिती दिली जात आहे.
 
या घटनेसंदर्भात रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजने पुष्टी केली की दिनेश थप्पड मारल्यानंतर रुळावर पडला. त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला अटक केली. दादर जीआरपीच्या तपासानंतर अविनाश माने आणि शीतल माने यांच्याविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांद्रयानची लवकरच चंद्राला मिठी : आता लँडरचा वेग कमी होणार, 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. वाचा पूर्ण रिपोर्ट