Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vistara एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, मुंबईत आपत्कालीन लँडिंग

Vistara एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, मुंबईत आपत्कालीन लँडिंग
, गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (12:12 IST)
Vistara एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाली आहे. विस्तार विमान हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे. यानंतर विमान आयसोलेशन भागात नेण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार विस्ताराच्या फ्रँकफर्ट-मुंबई विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे, त्यानंतर विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात एकूण 147 प्रवासी होते. विस्तारा एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले आहे की, '16 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना फ्लाइट क्रमांक UK 028 मध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. तसेच हे विमान फ्रँकफर्ट, जर्मनी येथून मुंबईसाठी चालते. फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती.    
 
तसेच प्रोटोकॉलनुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ कळवण्यात आले. विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. यानंतर विमान आयसोलेशन भागात नेण्यात आले, जिथे सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले.
 
मंगळवारी रात्री फ्रँकफर्ट येथून विमानाने उड्डाण केले होते.विस्तारा एअरलाइन्सच्या फ्रँकफर्ट-मुंबई विमानाने बुधवारी रात्री 8.20 वाजता फ्रँकफर्टहून मुंबईसाठी उड्डाण केले. नंतर बुधवारी सकाळी 7.45 ला हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईत आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर विमान वेगळ्या भागात नेऊन त्याची तपासणी करण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता, पॅरोलवर बाहेर येताच आरोपी पत्नीचा खून करून फरार