Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका

मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका
, शनिवार, 12 जून 2021 (07:50 IST)
भारतीय हवामान खात्याने दिनांक १३ जून आणि १४ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. १४ जून २०२१ या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने समुद्र किनारी आणि धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असं आवाहन केलं आहे.  लोकांनी देखील गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील नियंत्रण कक्ष आणि इतर सर्व नियंत्रणांना High Alert देण्यात आला आहे.  यासाठी  आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. 
 
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत. एनडीआरएफ देखील आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरिता तत्पर आहेत.
 
सर्व विद्युत सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे आले असून त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतत्पर आहे. पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या ऑगस्टअखेरपर्यंत जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात लस कशी देता येईल असा प्रयत्न करणार - अजित पवार