Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत काही भागात पाणीपुरवठा बंद, वाचा का आणि कधी

मुंबईत काही भागात पाणीपुरवठा बंद, वाचा का आणि कधी
, शनिवार, 31 जुलै 2021 (08:09 IST)
मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ३ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या झडपा बदलणे,जलवाहिनी जोडणी करणे, फ्लो मिटर बसविणे इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० या कालावधीत कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, राम मंदिर रोड, गोरेगावात काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, त्यामुळे नागरिकांनी त्यापूर्वीच पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा व त्या पाण्याचा जपून वापर करावा,असे आवाहन पालिका जलअभियंता यांनी केले आहे. शीव-माटुंगा आणि प्रभाग लालबाग-परळ वगळता पश्चिम उपनगरात सर्व विभागात १५ टक्के पाणी कपात होणार आहे. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 
घाटकोपर ( प.) येथील आनंद नगर उदंचन केंद्र व वर्षानगर उदंचन केंद्रावरुन पुरवठा होणारा परिसर, भटवाडी, बर्वे नगर,भीम नगर,गोळीबार रोड,जगदुशा नगर, रामजीव नगर, सिद्धार्थ नगर,गावदेवी, अमृत नगर,आझाद नगर, पारशी वाडी, काजू टेकडी, गंगावाडी इत्यादी ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहील. कुर्ला येथील कुर्ला विभाग क्रमांक १५७ संघर्ष नगर, खैरानी मार्ग आणि परिसर, विभाग क्रमांक १५८ यादव नगर,वृंदावन वसाहत,अंजली मेडिकल परिसर, विभाग क्रमांक १५९ दुर्गामाता मंदीर रोड, लोयलका कंपाऊंड,भानुशाली वाडी,चर्च गल्ली व परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.
 
अंधेरी (पूर्व) येथील बांद्रेकरवाडी, प्रिंन्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, वांद्रे प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी,हंजर नगर,झगडापाडा, पारसी वसाहत,जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ,जुना नागरदास मार्ग,मोगरपाडा,न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग,आर के सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसरात पाणीपुरवठा बंद राहील तसेच,अंधेरी ( पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल, जुहू कोळीवाडा,क्रांतीनगर, विलासनगर, शक्तीनगर,कदमनगर,आनंद नगर, पाटीलपुत्र,चार बंगला,विरा देसाई रोड,मोरगाव,यादव नगर,कॅ.सावंत मार्ग,जोगेश्वरी स्टेशन मार्ग,सहकार मार्ग, बांदिवली टेकडी, स्वामी विवेकानंद रोड,गुलशन नगर,आर.एम मार्ग या भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे.
 
अंधेरी (पूर्व) या विभागातील विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण,मांजरेकरवाडी,बिमा नगर,पंथकी बाग, तेली गल्ली,हाजी जुमान चाळ,कोळ डोंगरी,जीवा महाले मार्ग,साई वाडी,जीवन विकास केंद्र,शिवाजी नगर,संभाजी नगर,हनुमान नगर,श्रद्धानंद मार्ग,नेहरू मार्ग,तेजपाल मार्ग,शास्त्री नगर,आंबेडकर नगर,काजुवाडी,विले पार्लेचा आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच, पी/ दक्षिण भागातील बिंबिसानगर येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचा धोका झाला कमी