राज्यात पाऊस असून देखील पाणी कपातीमुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहे.
सध्या तलावांची पाणीपातळी 73टक्क्यांवर पोचल्यामुळे मुंबईकरांसाठी बीएमसीने 29 जुलै पासून 10 टक्के पाणी कपात रद्द केली आहे. पाणीकपातीच्या 53 दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
बीएमसी आयुक्तांनी 25 जुलै रोजी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली होती. तलावांची पाणीपातळी कमी झाल्यावर बीएमसी कडून 30 मे ते 4 जून पर्यंत 5 टक्के आणि मुंबईत 5 जून पासून 10 टक्के पाणीकपात करायला सुरु केले.
पाणीटंचाईमुळे मुंबईकर त्रस्त झाले असून तलावांत 73 टक्के पाणी साचले आहे. त्यामुळे आता पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.