Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय म्हणता, ४५ रुग्ण महापालिकेच्या रेंजमध्ये नाही

काय म्हणता, ४५ रुग्ण महापालिकेच्या रेंजमध्ये नाही
, बुधवार, 24 जून 2020 (09:35 IST)
मुंबईतील काही रुग्णालयातून करोनाबाधित रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर काही विभागांमध्ये करोना चाचणी करणारे रुग्णच महापालिकेच्या रेंजमध्ये आलेले नाहीत. मालाडच्या पी-उत्तर विभागातच अशाप्रकारे करोना चाचणी केलेल्या ४५ रुग्णांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नसून अशाप्रकारे महापालिकेच्या २४ विभागांमध्ये शेकडो रुग्णांचा पत्ताच महापालिकेच्या अधिकार्‍यांना लागलेला आहे. मात्र, मालाडमधील घटना समोर येताच आता पोलिसांच्या मदतीने या सर्वांचे ट्रेसिंग करून शोध घेण्याचे काम महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
 
मुंबईतील मालाड येथील पी-उत्तर विभागांमध्ये सध्या ३८०३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मालाडच्या विभागातील करोनाबाधित रुग्णांचा आढावा घेतला, त्यावेळी काही अधिकार्‍यांनी, करोना चाचणी केलेल्या काही रुग्णांचा अद्याप शोध लागत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तीन दिवसांपूर्वी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी ज्या रुग्णांनी तपासणी केली होती आणि ज्यांचे फोन नॉटरिचेबल तसेच घरचा पत्ता सापडत नसल्याने त्यांची यादी नगरसेवकांच्या ग्रुपवर पाठवत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सोमवारी आयुक्तांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा आल्यानंतर, आयुक्तांनी यासाठी पोलिसांची मदत घेऊन या संशयित रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हा दाखल