Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

''मनसे जिंकवा, मुंबई वाचवा" अशी सोशल माडियावर मोहीम सुरू

''मनसे जिंकवा, मुंबई वाचवा
, गुरूवार, 24 जून 2021 (09:47 IST)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून "मनसे जिंकवा,मुंबई वाचवा" अशी सोशल माडियावर मोहीम सुरू केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि इतर प्रमुख नेत्यांची छायाचित्रांसह "मनसे जिंकवा,मुंबई वाचवा" अस लिहलेल्या इमेजेस सध्या सोशल मीडियावर चांगल्याच वायरल झाल्या आहेत.
 
तीन महिन्या पूर्वी मनसेकडून मुंबईत लोकसभा निहाय नेते आणि सरचिटणीस यांच्या टीम कडून महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला होता. यामध्ये पक्षाची त्या विभागात किती ताकद आहे काय बदल केले पाहिजेत, या सर्वांचा आढावा घेण्यात आला होता. याचा अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे नेते आणि सरचिटणीस यांच्याकडून देण्यात आला आहे.सध्या मनसेकडून महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने विभागवार बैठका सत्र सुरू आहे.
 
२००७ साली मनसेच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी मनसेचे सात नगरसेवक मुंबईत निवडून आले होते, तर २०१२ साली झालेल्या निवडणुकीत मनसेला मुंबईत घवघवीत यश मिळाले आणि मनसेचे मुंबईत २७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर २०१७ साली झालेल्या निवडणुकीत मनसेची घसरण झाली आणि मनसेचे सातच नगरसेवक निवडून आले त्यातील सहा नगरसेवकांनी ही शिवसेनेत प्रवेश केला. सध्या मनसेचा एकच नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत जोरदार कमबॅक करण्यासाठी मनसेची सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' रुग्णाचा मृत्यू