Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिम उघडण्यासोबतच ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जिम उघडण्यासोबतच ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई , शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (07:26 IST)
मुंबईत लोकल सेवेला अजूनही मुभा देण्यात आली नसल्याने मुंबईरांचे चांगलेच हाल होत आहे. तसेच लोकल न सुरू केल्याने याचा पूर्ण ताण बेस्ट सेवेवर पडताना दिसत आहे.
 
कोरोनाच्या संकटामुळे बससेवा देत असताना फिजिकल डिस्टन्स ठेवता येण्यासाठी बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने चालवल्या जात नव्हत्या, मात्र आता राज्य सरकारने यांनी या बेस्ट बससेवा पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी दिली आहे.
 
बेस्ट पूर्ण क्षमतेने वाहतुक सुरू करण्यासोबतच राज्यात जिम सुरू करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे. २५ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व जिम सुरू होणार आहे.
 
सरकारच्या या निर्णयामुळे जिम मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व जिम जरी सुरू होत असल्या तरी कंटेन्मेंट झोनमधल्या जिम बंदच असणार आहे. तसेच सुरू झालेल्या जिममध्ये सोशल डिस्टनसिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
 
दरम्यान, पुढील २-३ दिवसात लोकलबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी म्हटले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ईद-ए-मिलादसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर