Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण,सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल

manse
, गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (21:29 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मुंबादेवी परिसरात घडली. बॅनर लावण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे. प्रकाश देवी असे पीडित महिलेचे नाव असून, त्यांच्या मेडीकलसमोर मनसेचे कार्यकर्ते खांब उभे करून बॅनर लावत होते. तेव्हा महिलेने या बॅनर लावण्याला विरोध केला असता, तिला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीत ही महिला दोन वेळा खाली पडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मनसेचे मुंबादेवी परिसरातील विभाग प्रमुख विनोद अरगिळे यांनी पीडित महिलेला मारत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर, त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. महिलेने चापट मारण्याचे कारण विचारले असता, अरगिळे यांनी महिलेला धक्का दिला. त्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी केली. पण दोघांमधील वाद पुन्हा वाढला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परब यांच्या रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही : सोमय्या