हिजाबच्या समर्थनार्थ आज काँग्रेसच्या (congress) महिला आघाडीने शिवाजी चौकात हा मोर्चा आला. यावेळी प्रचंड संख्येने महिला जमल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडीही झाली आणि बघता बघता अचानक महिलांमध्येच झटापट सुरू झाली. अचानक दोन गटात बाचाबाची सुरू झाल्याने वातावरण गरम झाले. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी काही महिला पाठविण्यात आल्याचा आरोप काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केला आहे. तर, या महिला कोण होत्या याबाबतची काहीच माहिती मिळू शकलेली नाही.
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या महिला आघाडीकडून हिजाबच्या समर्थनासाठी छत्रपती शिवाजी चौक परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनाकरीता काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. आंदोलन सुरु झाले. त्याचवेळी गझल मांडेकर नावाच्या एका महिलेने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद घातला. गझल मांडेकर यांचे म्हणण आहे की, हिजाब आमचा हक्क आहे. तो हिरावून घेऊन शकत नाही. मात्र काँग्रेस राजकारण करीत आहे. त्यानंतर येथील काँग्रेस कार्यकर्त्या आणि गझल सोबत असलेल्या काही महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.