Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारू पिण्यावरून राडा; मालवणी परिसरात तरुणाची जमावाकडून हत्या

दारू पिण्यावरून राडा; मालवणी परिसरात तरुणाची जमावाकडून हत्या
मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबोजवाडी परिसरातील एका जमावाकडून तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला असून मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मारहाण करणा-यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.
 
आरोपी आणि मृत तरुण हे दोघेही शेजारी राहणारे आहेत. आरोपी गोंिवद चव्हाण आणि उज्जा चव्हाण हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये दारू पिण्यावरून किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असल्याची माहिती आहे. या हाणामारीत उज्जा चव्हाण हा गंभीर जखमी झाला. जमावाकडून होत असलेल्या बेदम मारहाणीत उज्जाचा जागेवरच मृत्यू झाला. मारहाण करणा-या जमावामध्ये महिलांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, मारहाणीची घटना सुरू असताना अनेक बघ्यांची गर्दी होती. मात्र, कोणीही मारहाणीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
 
या मारहाणीची माहिती पोलिसांना कळवण्यात आली होती. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मालवणी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचा-यांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी जमावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी गोंिवद चव्हाण या आरोपीस अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगे पाटील कल्याण दौर्‍यावर