समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी मंगळवारी पोलिस मुख्यालयात शरणागती पत्करली.आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या अटकेची तयारी करणार्या मुंबई पोलिसांनी त्यांना अटक न करताच परत जाण्याचा सल्ला दिला.
चितावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकार्यांनी स्पष्ट केले होते.
यानंतर आझमी यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसमवेत शरणागती पत्करली. आपण पोलिसांना हवे ते सहकार्य करण्यास तयार असून, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे आवाहन त्यांनी केले आहे.