राज ठाकरे सध्या कृष्णकुंजवरच आहेत. अद्याप त्यांना अटक करण्यात आली नसून, त्यांना अटक झाल्यास जामीन न घेण्याच्या निर्णयावर मनसे ठाम असल्याची प्रतिक्रिया मनसेचे उपाध्यक्ष सारस्वत वागेश यांनी वेबदुनियाशी बोलताना व्यक्त केली आहे.
आम्ही राज यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्यांना भेटण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात असल्याचेही ते म्हणाले. राज ठाकरे यांना अटक केल्या नंतर उद्भवणार्या परिस्थितीचा सामना करण्यास मनसेचे कार्यकर्ते तयार असून, तूर्तासतरी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आल्याचेही सारस्वत यांनी स्पष्ट केले आहे.