मुंबई ही एकट्या महाराष्ट्राची नाही तर ती संपूर्ण भारताची असल्याचे सांगत, मुंबईतून कोणालाही बाहेर काढण्याचा अधिकार कुठल्याही पक्षाला नसल्याचे मत रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतून बिहारी माणसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आणखी बिहारी पाठवू असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अग्रलेखाविषयी आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टिकाही केली. मुंबईमध्ये राहण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. त्या अधिकाराचे हनन करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले.