मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होण्यापूर्वी सुरू झालेल्या हिंसाचारात काल पुणे होरपळून निघाले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जवळपास 47 बसची तोडफोड करून त्यापैकी काही बसमध्ये आग लावल्याचे वृत्त आहे.
एवढ्यावरच न थांबता काही जणांनी पुण्यात दुकानांनाही पेटवून दिले. आज पुण्यात तणावपूर्ण शांतात असून मंगळवारी झालेली हिंसा पाहता शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अनिल कुंभार यांनी दिली आहे.