मनसेच्या 213 कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर आता, पक्षाच्या पदाधिकार्या विरोधात कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या अंतर्गत पोलिसांनी मनसेचे महाराष्ट्र सचिव व राज ठाकरे यांचे निकटवर्तीय वसंत गीते यांना नाशिकमधून अटक केली आहे.
राज ठाकरे यांना अटक होणार असल्याच्या वृत्ताने नाशिकमध्ये अनेक उत्तरभारतीयांच्या दुकानांवर तोडफोड करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी नाशिक मधील मनसेच्या 116 कार्यकर्त्यांना अटक केली होती.