Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसेच्या कार्यकर्त्याविरूद्ध खूनाचा गुन्हा

मनसेच्या कार्यकर्त्याविरूद्ध खूनाचा गुन्हा

वेबदुनिया

, शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:20 IST)
राज ठाकरे यांच्या अटकेनंतर नाशिकमध्ये उसळलेल्या हिंसाचारात बळी गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुंबई- आग्रा महामार्गावर के. के. वाघ महाविद्यालयाच्या समोर एका बसवर केलेल्या दगडफेकीत अंबादास धारराव (वय ५५) हे दगड लागून मृत्युमुखी पडले होते. यासंदर्भातील प्रमुख आरोपी संदीप भवर कालच फरारी झाला होता. पण त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. श्री. धारराव हे एचएएलमध्ये कर्मचारी होते. कामावरून ते घरी परतत असताना हा प्रकार घडला होता. पोलिसांनी भवरविरूद्ध ३०२ या कलमाखाली खूनाचा गुन्हा दाखल केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi