Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतील 'राज' नाट्य....

मुंबईतील 'राज' नाट्य....

वेबदुनिया

मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:58 IST)
मंगळवारची पहाट मुंबईकरांसाठी तणाव निर्माण करणारी होती.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होणार असल्याच्या अफवांनी, मुंबईसह महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

यातूनच राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येऊन या मार्गाची वाहतूक पोलिसांनी अचानक थांबवल्याने मनसेच्या कार्यकर्त्यां मधील धुमसणारा राग राज्यभरातील उत्तरभारतीयांवर उतरला.

नाशिकमध्ये तर शालीमार बाजारात काही टोळक्यांनी उत्तरभारतीयांच्या दुकानात तोडफोडही केली. तसेच सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतीतील उत्तरभारतीय कामगारांना धमकावण्याचे प्रकारही घडले.

राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणार्‍या पुण्यातही असाच हुडदंग काहीजणांनी केला. राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करत काही जणांनी शासनाचा राग राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर काढला.

बीड, अमरावती, माजलगाव, औरंगाबाद, आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमध्येही तोडफोड करण्यात आली. हा जनप्रक्षोभ होता असे मत यानंतर मनसेच्या काही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे, तर ही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली हिंसा असल्याचे सांगत राज्यभरातून 213 मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण या सार्‍या राजकीय नाट्यात भरडला गेला तो सामान्य माणूस.

जर राज ठाकरे यांना अटक करायची नव्हती तर पोलिसांनी कृष्णकुंजला वेढा का दिला असा प्रश्न आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तर यात आमची काय चूक होती अशी भावुक प्रतिक्रिया नाशिकमधील एकाविक्रेत्याने व्यक्त केली आहे.अगदी सिनेस्टाईल घडलेल्या या राजकीय नाट्याचा शेवटही सिनेस्टाईल झाला असेच म्हणावे लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi