Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई कुणाची जहागिरी नाही-शिवराज पाटील

मुंबई कुणाची जहागिरी नाही-शिवराज पाटील

भाषा

रायपूर , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:20 IST)
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कुणाची जहागिरी नाही. मुंबई देशाची शान आहे आणि ही शान मिळवून देण्यात देशातील सर्वांचाच वाटा आहे, असे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी म्हटले आहे.

नक्षलवाद्यांसंदर्भातील बैठकीसाठी ते येथे आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मुंबईचे आजचे स्थान देशभरातून आलेल्या लोकांमुळे प्राप्त झाले आहे. पण काही लोक कोणत्या कारणासाठी वाद उत्पन्न करत आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहे.

महाराष्ट्र, आसाम व इतर काही राज्यांमध्ये बाहेरील राज्यांतून येणार्‍या लोकांना होणारा विरोध पाहता तेथे वर्क परमिट देण्याची व्यवस्था व्हायला हवी काय असे विचारले असता ते म्हणाले, की हा देश एक आहे. त्याची घटनाही एक आहे. असे असताना हा भेदभाव, अशा व्यवस्थेची गरज काय? वाढत्या प्रांतीयवादाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्रातील हा सध्याच्या प्रश्न केवळ संकुचित मनोवृत्तीमुळे निर्माण झाला असून तो निपटवण्याची गरज आहे. त्याला आमची अभेद्य एकता हेच उत्तर देता येईल, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi