राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेकांवर टीकेची झोड उडवली. यात प्रामुख्याने रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, अबू आझमी,
अमरसिंह, अमिताभ, जया बच्चन यांचा समावेश होता. परंतु राज यांच्या सुमारे 75 मिनिटांच्या भाषणा नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या
इशारावजा सूचना आगामी काळात मनसेच्या आंदोलनाचे संकेत देऊन गेल्या.
आपल्या भाषणा नंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर राज यांनी पुन्हा माइकचा ताबा घेतला. आणि तीन सूचना त्यांनी
कार्यकर्त्यांना दिल्या. यात...
1. या सभेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आहेत, त्यांना आधी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यायचा आहे.
2. सभा झाल्यानंतर कोणीही गडबड गोंधळ करायचा नाही, सर्वांनी व्यवस्थित घरी जायचे आहे, यापूर्वीही काही जणांना अपघातात इजा
झाली आहे, आता मला ते नको आहे. मला या महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे,
3.पोलिसांना त्रास देऊ नका, त्यांना त्यांचे काम करू द्या, त्यांना नंतर त्रास द्यायचाच आहे, ही गोष्ट वेगळी. राज यांच्या या तीसर्या सूचनेवर कार्योकर्त्यांनी जाताजाता जोरदार टाळ्या दिल्या.