Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता

राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता

वेबदुनिया

मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:49 IST)
मुंबईत प्रांतीयवाद भडकवून तणाव निर्माण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने राज ठाकरेंविरूद्ध कारवाई करण्यासाठी विधी विभागास कायदेशीर सल्ला मागितला आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक पी. एस. पसरीचा यांनी राज ठाकरेंना अटक करण्यासंदर्भात अंतिम निर्णय मुंबईच्या पोलिस आयुक्तांना घ्यायचा असल्याचे स्पष्ट केले. 'मनसे' व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांत संघर्षानंतर महानगरातील वातावरण तापले आहे.

दरम्यान राज ठाकरे पुण्यास रवाना झाले असून त्यांना मुंबईबाहेर अटक करण्यात येईल, असा कयास बांधण्यात येत आहे. मुंबईत अटक झाल्यास कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याची भिती सरकारला आहे.

आतापर्यंत मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांना राजच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर उपनगरातील दुकाने बंद करण्यास सुरूवात केली आहे. राज यांना अटक झाल्यास दादर बंदचे आवाहनही करण्यात येऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi