मनसे नेते राज ठाकरे यांनी काल शिवाजी मैदानावर झालेल्या आपल्या जाहीर सभेत पक्षाचे आगामी धोरण तर मांडलेच परंतु मनसेची इतर राज्यांप्रती असलेली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
आपल्या घणाघाती भाषणात राज यांनी मुंबईतील उत्तरभारतीयांचा जोरदार समाचार घेतला. मुंबईला नासवण्यात त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप राज यांनी या प्रसंगी केला.
मनसेचा गुजरातींना विरोध नाही, मुंबईत बंगाली आहेत, पंजाबी आणि पारशीही मुंबईत रहातात परंतु त्यांना आपला विरोध नसल्याचे सांगतानाच मुंबई फक्त बिहारी आणि यूपी वाल्यांनी खराब केल्याचेही राज यांनी स्पष्ट केले.
मुंबईत राहायचे असेल तर बाहेरून आलेल्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असा इशाराही राज यांनी आपल्या भाषणातून दिला.