Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंसाचाराला राज व आझमी जबाबदार-भुजबळ

हिंसाचाराला राज व आझमी जबाबदार-भुजबळ

वार्ता

नाशिक , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:20 IST)
राज्यातील हिंसाचाराबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे व अबू आझमी यांना जबाबदार धरले आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या भुजबळ यांनी राज व आझमी यांच्या जुगलबंदीतून सुरू झालेले हे आंदोलन दोघांच्याही राजकीय आधार निर्माण करण्याच्या गरजेतून निर्माण झाल्याचे सांगितले. या सगळ्या प्रकारातून सामान्यांना मोठा त्रास झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही स्थिती हाताळण्यात राज्य सरकार कमी पडले हा आरोप त्यांनी नाकारला. दोन्ही नेत्यांना अटक करण्यासाठी सरकारकडे वेळ हवा होता. कारण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व तयारी करणे गरजेचे होते, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi