Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरसिंह यांचे मुंबईत 'मानापमान'

अमरसिंह यांचे मुंबईत 'मानापमान'

वेबदुनिया

मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:33 IST)
राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर, समाजवादी पक्षाने आपला मोर्चा आता इतर पक्षांकडे वळवला आहे.

एका खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना पक्षाचे महासचिव अमरसिंह यांनी राष्ट्रवादी कॅंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर तोफ डागली.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राज्याची मुळीच चिंता नाही. मी त्यांना भेटायला गेलो, तर मला त्यांच्या सुरक्षारक्षकांनी ते घरात नाहीत असे खोटे सांगितल्याचे अमरसिंह म्हणाले.

हा आपला अपमान असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. यानंतर उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना आपले लक्ष करत अमरसिंह यांनी, तेही आपल्याला भेट देत नसल्याने आपण व्यथित झाल्याचे सांगितले.

इतक्यावरच न थांबता, पोलिस राज यांच्या विरोधात कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना फक्त ‍िक्रकेटच चांगले जमते त्यांनी राजकारण करू नये असे वक्तव्यही अमरसिंह यांनी केले.

अमरसिंह यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याने खवळले असून, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर चालवलेली टीका त्वरित थाबवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi