Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये अटकेचे तीव्र पडसाद

नाशिकमध्ये अटकेचे तीव्र पडसाद

वेबदुनिया

नाशिक , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:19 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना अटक करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले असून 'मनसे'चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेडचा कर्मचारी मृत्युमुखी पडला आहे. नाशिकमध्ये 'मनसे'चे प्राबल्य असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरभर केंद्रीय राखीव पोलिस दल व निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

शहरात भितीचे वातावरर असून मजूरीचे काम करणार्‍या उत्तर भारतीयांनी आपापल्या राज्याकडे पलायन चालवले आहे. शहरात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे. वाहनांवर हल्ले करून मोडतोड करण्यात आली. दुकानेही बंद करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi