मुंबईमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी निमलष्करी दलाच्या पाच तुकड्या मुंबईमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
या तुकड्या लवकरच मुंबईत दाखल होत असून, त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात राज यांना अटक करणार असल्याचे बोलले जात आहे.
रविवारी राज ठाकरे यांच्या विरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या अटकेपूर्वी राज्यभर हिंसाचारास सुरुवात झाली होती.
पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड या भागात मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. याची गंभीर दखल केंद्राने घेतली असून, निमलष्करी दलाच्या तुकड्यांची कुमक महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राज प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुनसिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्राकडे केली होती.