मनसे नेते राज ठाकरे यांनी बिहारी जनते विरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. राज यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रीय जनता दलाने राजधानी पाटण्यात राज यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
राज यांच्या विरोधात राजदाच्या कार्यकर्त्यांनी महानगर अध्यक्ष खुर्शीद आलम सिद्दीकी यांच्या नेतृत्तवाखाली राज यांच्या विरोधात एक मोर्चाही काढला होता.
राज यांनी बिहारी जनता आणि रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात केलेले वक्तव्य अत्यंत दुर्देवी असून, आगामी काळात लालूंच्या नेतृत्त्वाखाली एक अभियान चालवून मंबईत छट पुजाही करण्याचा संकल्प राजदच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.