मुंबईच्या विविध भागात सुरू असलेल्या हिंसक आंदोलन प्रकरणात पोलिसांनी मुंबई आणि परिसरात अटकसत्र सुरू केले आहे. या अंतर्गत पोलिसांनी विविध भागातून 92 जणांना अटक केली. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 73 आणि समाजवादी पक्षाच्या 19 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अजून काही जणांना अटक केली जाणार असल्याची माहिती मुंबईचे सहपोलिस आयुक्त के.
एल. प्रसाद यांनी दिली आहे.