Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Guru Nanak Jayanti 2021 :गुरु नानक देव यांचे 2 विशेष प्रेरणादायी प्रसंग

webdunia
, बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (14:07 IST)
गुरु नानक देवजींच्या जीवनाशी संबंधित एका प्रसंगानुसार, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. एक राजा होता, तो क्रूर होता .आपल्या प्रजेला खूप त्रास देत होता.आणि इतरांची संपत्ती लुटायचा. 
 
एके दिवशी गुरु नानक देव त्या क्रूर राजाच्या राज्यात पोहोचले. राजाला हे कळताच तो देखील गुरु नानकांना भेटायला गेला. शिष्यांनी गुरु नानकांना राजाविषयी सर्व काही सांगितले होते. म्हणूनच राजा त्यांच्या कडे आला तेव्हा त्यांनी राजाला म्हटले की, राजा, आपण मला मदत करा, माझा एक दगड आपल्या कडे गहाण ठेवा.हा दगड मला खूप प्रिय आहे . याची विशेष काळजी घ्या.
 
राजा म्हणे - ठीक आहे, मी ठेवतो, पण आपण हे परत कधी नेणार? नानकजींनी उत्तर दिले की जेव्हा आपण मरणार आणि मृत्यूनंतर भेटू तेव्हा  हा माझा दगड आपण मला परत द्या. नानकजींचे ऐकून राजाला आश्चर्य वाटले, ते म्हणाले - हे कसे शक्य आहे? मृत्यूनंतर कोणी काहीही सोबत कसे काय घेऊन जाऊ शकतो ?
 
तेव्हा गुरू नानक देव म्हणाले- जेव्हा आपल्याला हे माहित आहे, तेव्हा आपण  लोकांची संपत्ती लुटून आपली तिजोरी का भरत आहात ? आता राजाला गुरु नानकजींना काय म्हणायाचे आहे ते समजले. त्यांनी नानकजींची माफी मागितली आणि शपथ घेतली की यापुढे ते कधीही आपल्या प्रजेवर अत्याचार करणार नाहीत. यानंतर राजाने आपल्या खजिन्यातील जमा केलेला पैसा प्रजेच्या देखभालीसाठी वापरण्यास सुरुवात केली. 
 
प्रेरक प्रसंग भाग 2. 
 
गुरु नानक देव एकदा एका गावात गेले होते, तेथील लोक नास्तिक विचारसरणीचे होते. त्यांचा देवावर, उपदेशावर आणि उपासनेवर अजिबात विश्वास नव्हता. तिथले गावकरी साधूं संतांना ढोंगी म्हणायचे . त्यांनी नानकांना देखील चांगली वागणूक दिली नाही.त्यांना फार वाईट बोलले आणि त्यांचा तिरस्कारही केला, तरीही नानकदेव शांत राहिले. 
 
दुसऱ्या दिवशी जेव्हा नानकजी  तिथून निघू लागले तेव्हा लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, जाण्यापूर्वी आपण आम्हाला आशीर्वाद तरी देऊन जावे.. गुरु नानक देव हसले आणि म्हणाले, 'खुशाल राहा.' जवळच्या दुसऱ्या गावात पोहोचल्यावर तिथल्या लोकांनी त्यांचे आदरातिथ्य केले आणि राहण्याची आणि जेवणाची योग्य व्यवस्था केली. 
 
नानकजींनी त्यांच्यासमोर प्रवचन केले. प्रवचन संपल्यावर, भक्तांनी त्यांना आशीर्वाद देण्याची विनंती केली, तेव्हा नानकजी म्हणाले, 'सर्वनाश होवो.' जेव्हा त्यांच्या शिष्यांनी नानकजींचे असे बोलणे ऐकले  तेव्हा त्यांना काहीच कळाले नाही. त्यांच्यापैकी एका शिष्याने ने त्यांना विचारले - 'गुरुदेव, आपण ह्यांना असा काय  विचित्र आशीर्वाद दिलात. ज्यांनी आपले एवढे आदरातिथ्य केले त्यांना सर्वनाश होण्याचा आशीर्वाद दिला.मला हे काही समजले नाही कृपया आपण हे स्पष्ट करा.
 
तेव्हा हसत नानकदेव म्हणाले, 'सज्जन ज्या ठिकाणी जातात आपल्या वागण्यामुळे ते आनंदी वातावरण करतात, परंतु जर वाईट लोक जिथे जातात तिथले वातावरण अधिकच खराब करतात , म्हणून अशा वाईट लोकांनाम्हणजे जिथे आहात तिथेच 'खुशाल रहा' असा आशीर्वाद दिला. ' गुरू नानक देवांचे  हे म्हणणे ऐकून शिष्य त्यांच्या पायाला स्पर्श केले आणि म्हणे, 'गुरुदेव, आपण जे काही करता ,जे काही म्हणता त्यामागे ज्ञान दडलेले आहे, जे आम्ही कोणीही समजू शकत नाही.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुळशीचं रोप सारखं मरतंय ? मग कारण जाणून घ्या आणि या प्रकारे घ्या काळजी