Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘वंदे मातरम्’वरून वादाला सुरुवात

‘वंदे मातरम्’वरून वादाला सुरुवात
, गुरूवार, 27 जुलै 2017 (16:54 IST)

‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका’ असं अबू आझमी म्हणाले. 

दुसरीकडे याच मुद्द्यावरुन शिवसेनाही मैदानात उतरली आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी ‘माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी वंदे मातरम् बोलणार नाही’ असं म्हटलं होतं. याला सेना नेते दिवाकर रावते यांनी उत्तर दिलं आहे.

‘गळ्यावर सुरी ठेवण्याचा प्रश्नच नाही. मात्र इतकीच लाज वाटत असेल, तर स्वतः चालते व्हा. ही आमची मातृभूमी आहे. या भूमीला स्वतंत्र करणारं हे गीत आहे. त्या गीताचा आदर करण्याचा जर त्रास होत असेल, तर इथून निघून जा. ह्यांना पाकिस्तानची आठवण का येते? बांग्लादेशची आठवण का होत नाही? हे राहतात इथे, मात्र मनाने पाकिस्तानी आहेत.’ अशा शब्दात रावतेंनी संताप व्यक्त केला.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सापाच्या जोडीमुळे शाळेची सुटी (Video)