Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अण्णांना भाजपाने घातला हार

अण्णांना भाजपाने घातला हार
दिल्ली , शनिवार, 31 जानेवारी 2015 (11:50 IST)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेले व्यंगचित्र प्रसिध्द केल्याने भाजपा अडचणीत आले आहे. अप्रत्यक्ष अण्णांची हत्या करणार्‍या भाजपाने माफी मागावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
 
अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपाने या व्यंगचित्राचा आधार घेतला आहे.  यामध्ये हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला असल्याचे दाखविण्यात आले आहे. या मुद्द्यावरून अरविंद केजरीवला यांनी भाजपावरच टीका केली असून  भाजपाने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi