Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अफजल गुरूच्या कुटुंबीयांना तिहारमध्ये का बोलावले?

अफजल गुरूच्या कुटुंबीयांना तिहारमध्ये का बोलावले?
नवी दिल्ली , मंगळवार, 12 फेब्रुवारी 2013 (16:18 IST)
FILE
अफजल गुरूच्या कुटुंबीयांना तिहार तुरूंगात येऊन अफजलचे थडगे पाहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. २००१ मधील संसद हल्ला प्रकरणात दोषी आढळल्यानंतर तीन दिवसांअगोदर त्याच्यावर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली होती.

जवळचे नातेवाईक येऊन थडग्यास प्रार्थना अर्पण करत असल्यास कसलीही हरकत नसल्याचे गृहसचिव आर के सिंह यांनी स्पष्ट केले.

यासाठी लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल. अफजलच्या तुरूंग कालावधीतील सर्व वस्तू याचवेळी कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात येईल. याअगोदर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अफजलच्या कुटुंबीयांची विनंती मान्य करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi