Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अफजल गुरू तुरूंगात वाचायचा अडवाणींचे आत्मवृत्त

अफजल गुरू तुरूंगात वाचायचा अडवाणींचे आत्मवृत्त
, सोमवार, 11 फेब्रुवारी 2013 (17:26 IST)
FILE
अफजल गुरू अडवाणींच्या आत्मवृत्ताचे पठण करायचा असे सांगितल्यास खरे वाटणार काय? मात्र हे सत्य आहे. तुरूंगातील दिवसात त्याच्या संग्रहात अडवाणींच्या ‘माय कंट्री माय लाइफ’ या पुस्तकाचाही समावेश होता.

अफजल यांस संसद हल्ला प्रकरणात फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर तिहार तुरूंग प्रशासनाने त्याचे साहित्य कुटुंबीयांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा चश्मा, गादी, रेडिओ, पेन, डायरी व पुस्तके तुरूंगात आहेत.

हे साहित्य परत करण्यासाठी त्याचे कुटुंबीय किंवा वकिलास बोलावण्यात येऊ शकते. अफजलची राजकारण व तत्वज्ञानाची पुस्तके वाचण्यात रूची होती. त्याने तुरूंगातील गेली 12 वर्षे याच पुस्तकांसोबत घालवली होती. (वृत्तसंस्था)

Share this Story:

Follow Webdunia marathi