Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दिलासा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दिलासा

भाषा

, शनिवार, 15 डिसेंबर 2007 (10:55 IST)
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या खाजगी जीवनाबद्दल स्टारडस्ट या चित्रपटविषयक नियतकालिकाने लेख प्रकाशित करू नये हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने शिल्पाला दिलासा दिला.

2001 मध्ये शिल्पा शेट्टीने स्टारडस्टविरूद्ध दाखल केलेला वीस कोटी रूपयांचा नुकसान भरपाई दावा लवकरात लवकर निकाली काढावा असे न्यायमूर्ती अरिजीत पसायत व न्यायमूर्ती पी. सत्यशिवम यांच्या खंडपीठाने निकालपत्रात नमूद केले आहे.

हे नियतकालिक शिल्पा शेट्टीचे काही अभिनेत्यांबरोबर व एका विवाहित व्यक्तीशी असलेल्या संबंधावर लेख प्रसिद्ध करू इच्छित होते. त्याविरूद्ध शिल्पा 12 जानेवारी 2001 ला मुंबई उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाकडून अंतरीम आदेश मिळविण्यात यशस्वी झाली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi