Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमिताभ बच्चन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट..

अमिताभ बच्चन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट..
, सोमवार, 22 डिसेंबर 2014 (11:41 IST)
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, रेसकोर्सवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बच्चन हे कामासाठी राजधानी दिल्लीत आले आहेत. भेटीचा नेमका उद्देश स्पष्ट झाला नसला तरी ही सदिच्छा भेट होती, असे समजते. पंतप्रधान कार्यालयाने मोदी-बच्चन भेटीचे छायाचित्र ट्विट केले आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बच्चन गुजरात टुरिझमचे ब्रँड अँम्बेसिडर बनले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi