Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृत्यू

अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृत्यू

वेबदुनिया

इटानगर , बुधवार, 4 मे 2011 (12:03 IST)
WD
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त अवस्थेत आढळले असून, यात खांडू यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. खांडू यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा आज (बुधवारी) चार दिवसांनंतर शोध लागला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडू यांचे हेलिकॉप्टर तवांग जवळील दिजॉंग या धबधब्यात कोसळले. त्यात त्यांच्यासह वैमानिक जे. एस. बाबर, टी. एस. मामिक, खांडू यांचे सुरक्षा अधिकारी येशी चोड्डाक आणि येशी लामू यांचा मृत्यू झाला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi